सावली भक्तांची माऊली

गावाची माहिती आणि वैशिष्ट्ये

कृपेची सावली भक्तांची माऊली

श्री अंबिका माता बेलगाव तराळे ता इगतपुरी जी नाशिक नवसाला पावणारी एकटी धावणारी आणि भक्तांना तारणारी आदिशक्ती श्री अंबिका माता बेलगाव तराळे ग्रामस्थ आराध्य दैवत प्राचीन काळापासून भक्तावर कृपा आशीर्वादाची पाखर घालणाऱ्या या अंबिका मातेचा महिमा आघात आहे म्हणूनच बेलगाव आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्री अंबिका माता हे श्रद्धास्थान आहे तराळ्या डोंगराच्या कुशीत आणि दारणा माईच्या तीरावर वसलेल्या बेलगाव च्या दक्षिणेला अंबिका मातेचे मंदिर आहे पूर्वजांनी बांधलेले चिरेबंदी दगडात भिंती आणि कौलारू छप्पर असलेले मंदिर अस्तित्वात होते भाषणात कोरलेली हेमाडपंथी शिल्पाकृतीची अंबिका मातेची तेजस मूर्ती दगडी आसनावर विराजमान होती हेमाडपंथी कलाकुसरी असलेली पाषाणाची चौकट मंदिराची प्राचीनता दर्शवते मंदिर समोर अन्य देवतांच्या सिंदूर चर्चित पाषाणमूर्ती स्थित आहेत रोगराई आणि इडा पिडा यांचा नाश करून गावचा सदैव प्रतिपाळ करणारे या जागृत देवाच्या जुन्या मंदिराचे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आणि भाविक भक्तांचे योगदानातून मंदिराचा जनाधार करण्यात आला.

आरसीसी मध्ये सिमेंट काँक्रीटचे भक्कम स्वरूपाचे मंदिर हिरव्यागार माळराणार दिमाखात उभे आहे मंदिरावर विविध कलाकुसर केलेल्यांनी कमानी तसेच फुल पाकळ्यांचे नक्षीकाम केलेल्या कमानी तसेच फुलपाखरांना नक्षीकाम केलेल्या डेरेदार घुमटावर सूर्यकिरणांनी झळकणारा कळस शक्ती भक्तीची प्रेरणा देतोय मंदिराला जुन्या मूर्तीच्या जागी श्री अंबिका मातेची नूतन मूर्तीची स्थापना आहे व्याघ्र आसनावर बसलेली एका हाती खडक धारण करून एका हाती भक्तांच्या रक्षणासाठी स्थित असलेली श्री अंबिका मातेची सात्विक तेजस्वी मूर्ती मंदिर गाभाऱ्यात शासनावर संगमरवरी दगडाच्या कलाकुसरीच्या मखरात विराजमान आहेमाहे पौर्णिमेला देवीची जत्रा भरते ही परंपरा खूप जुनी आहे बेल गावाची जत्रा म्हणजे पंचक्रोशी आणि गावकऱ्यांचा आनंदोस्तव जत्रेच्या आदल्या दिवशी रात्री देवीचा चांदीचा मुखवटा सुवर्ण अलंकार आणि चोळी पातळ गावातून वाजत गाजत मंदिराकडे नेता नाही यावेळी अंबा माता की जय या जयघोषाने आणि गाव आणि परिसर दान आणून जातो मंदिरात जागर गोंधळाच्या गजरात देवीचा विविध अभिषेक पूजा करून अलंकार चढवली जातात देवीला चोळी पातळ नेसून खाना नारळाने ओटी भरून केले जाते अगरबत्ती यांचा सुगंधी दरवळत शुद्ध तुपात तेवणाऱ्या समय यामधील पंचजोती कापराचा सुवास फुल हारांचा मधुर सुगंध गोंधळ यांचा सांभाळाचा नाद तुंतुनेचा सूर झांजेचं झंकार आणि गोंधळाच्या मुखातून निघाले जयघोष उदे ग अंबे उदे तुझा जागर मांडला गोंधळाला येया नाद घोषाने सारे वातावरण भाऊ भक्तीत नाऊन निघते यावेळी शोभायमान मखरात विराजमान असलेल्या जगत माता अंबिका मातेची सात्विक रूप अधिकच खुलून दिसते दुसऱ्या दिवशी माही पौर्णिमा यात्रा भरते यावेळी सर्व गावकऱ्यांच्या आनंदाला उधान येते देवीच्या मंदिरात दिवसभर पूजा विधी प्रसाद सुरू असतात नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असलेली गावातील गावकरी यावेळी आपल्या कुटुंब कबीर यास आपल्या मायभूमीत येतात देवीचे चरण कमलावर नतमस्तक होतात शिकरुणा भागतात खना नारळाने ओटी भरतात दीपमाळेतील जाळतात आणि आपल्या हृदयाच्या ओंजळीत देवीचा आशीर्वाद भरभरून नेतात दिवसभर गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांची मंदिरात अलोट गर्दी दाट ते मंदिर परिसरात माणसांच्या गर्दीने फुलून निघते देवीच्या जागरण आणि निमित्त रात्री मनोरंजन चा कार्यक्रम असतो पूर्वी गाव-गावी तमाशा फड या जत्रेत हजेरी लावीत असं तमाशा सौकीना आणि कलाप्रेमी मंडळी आनंदाची परवानी असायची गणगवळण फार्स लावण्या सवाल-जबाब आणि वगनाट्य या रात्रभर जाणाऱ्या काळात सुरक्षित मंडळी रंगून जात पुढे जमाना बदलत गेला जुने काला प्रकार मागे पडत यात्रेच्या मनोरंजनात पडद्यावरच्या चित्रपटाने वरने लावली पुढे नारायणगाव सारख्या ठिकाणी तुकाराम खेडकर या प्रसिद्ध तमाशा यांच्या फडांनी बोल बेळगावचे यात्रेत हजेरी लावली कारण फक्त एकच यानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन देवीचे स्मरण सहवासा जागरण करणे असे सांगतात की तमाशा सम्राट दत्ता महाडिक पुणेकर यांनी आपल्या तमाशाचा प्रथम कार्यक्रम या देवीच्या यात्रेत सादर केला तेथेच त्यांना अंबिका मातेची कृपा आशीर्वाद प्राप्त झाला तदनंतर महाराष्ट्रभर या तमाशा च्या किर्तीचा झेंडा फडकत राहिला पूर्वी या यात्रेत एकट्याने 12 बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असे तसेच दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात येत असे यावेळी गावोगाव चे कुस्ती क्षेत्राचे पैलवान या ठिकाणी येऊन बेलगावच्या तांबड्या मातीत आपले कुस्ती क्षेत्रातील कसब दाखवीत यात्रा कमिटीच्या वतीने विजयी पैलवान यांना भरघोस बिदागी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते यात्रेची ही परंपरा आज तगा येत आहे दरवर्षी दरवर्षी अंबा मातेचा यात्रा उत्सव गाव वर्गणीतून साजरा करण्यात येतो.

अंबिका माता मंदिर

अंबिका माता मंदिर

लक्ष्मि कुबेर मंदिर

लक्ष्मि कुबेर मंदिर