ग्रामपंचायत बेलगाव तऱ्हाळे
यशोगाथा :-
बेलगाव तऱ्हाळे गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. बेलगाव तऱ्हाळे हे गाव घोटी सिन्नर रोड पासून तीन किमी गावामध्ये भात उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत असते. त्या भाताची विक्री तालुक्याचे ठिकाण घोटी शाहर येथे होते.त्या ठिकाणी तांदळाची निर्मिती करणाऱ्या राईस मिल मोठ्या प्रमाणात उभारलेल्या असून त्यांच्या द्वारे तांदळाचे उत्पादन करण्यात येते आहे. सदर तांदूळ हा महाराष्ट्रातल्या काना -कोपऱ्यात व्यावसायिकांमार्फत मोठ्या प्रमाणात व्यापार होत आहे. घोटी गाव हे मोठी बाजार पेठ असून शनिवार आठवडे बाजारा निमित्त लगतचे ठाणे, नगर, या अन्य जिल्ह्यातील व्यापारी गावात व्यापारा निमित्त मोठ्या प्रमाणात येत असतात. बेलगाव तऱ्हाळे गाव हे दारणा तिरावर वसलेले असून गावा लगत भाम , वाकी खापरी, भावली कवडदरा , दारणा , वैतरणा मुकणे असे ७ धरणे व त्रिंगळवाडी, कांचनगाव, वाडीवऱ्हे, खेड येथे बंधारे उभारण्यात आलेले आहे. सदर धरणाचे पाणी दारणा धरणा द्वारे छत्रपती संभाजी नगर व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येते असतो. घोटी गावालगत त्रिंगलवाडी, कावनई, कुरुंगवाडी, आवणपट्टा हे एतिहासिक शिवकालीन किल्ले आहेत. त्यामुळे बेलगाव तऱ्हाळे हे गाव पर्यटनासाठी महत्वाचे ठिकाण आहे.
बेलगाव तऱ्हाळे गावालगत धार्मिक स्थळे कावनई कपिलधारा तिर्थ , सर्वतीर्थक्षेत्र टाकेद , विपश्यना केंद्र इगतपुरी, गजानन महाराज तपोभूमी कावनई इत्यादी तीर्थक्षेत्र असून बेलगाव तऱ्हाळे गाव हे इगतपुरी जंक्शन रेल्वे स्टेशन पासून २० किमी अंतरावर आहे
*ग्रामपंचायत कार्यालय :- सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे असून कार्यालयातच भूमीअभिलेख कार्यालय व तलाठी कार्यालय व सार्वजनिक साधना वाचनालय व अभ्यासिका आहे.
* शैक्षणिक संस्था बाबत माहिती :- गावात प्राथमिक जि.प. शाळा - २ , माध्यमिक विद्यालय १,व अंगणवाडी ३, असलेल्या शाळेत अनेक
विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी आहेत.*
*ग्रामीण रुग्णालय :- धामणगाव येथे ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून तालुका आदिवासी असल्यामुळे आदिवासी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आदिवासी व इतर नागरिकांना ग्रामीण रुग्णालयाकडून सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत असतात. सदर रुग्णालयाच्या वतीने कोविड कालावधी मध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा दिलेली असून कोविड लसीकरणचे मोठ्या प्रमाणात नागरिकांना लसीकरण करून कोविड पासून नागरिकांचा बचाव करण्यात आला आहे. सद्च्या स्थितीत सदर ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची उपचार घेण्यासाठी वाढ झालेली आहे.
*बस स्थानक : बेलगाव तऱ्हाळे गावात स्वतंत्र बस स्थानकाची सुविधा आहे विद्यार्थी व व्यापारी यांना त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्याची सुविधा बस मार्फत नियमित होत असते.
* गावात मारुती मंदिर, बुद्धविहार, सभामंडप , ग्रीन जिम व रस्ते सिमेंट कॉँक्रिटकरण, झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे.
*पाणीपुरवठा:- सध्या स्थितीत जुनी ५० वर्षापूर्वीची पाणीपुरवठा योजना असून पंपिंग हाउस व फिल्टर मार्फत पाण्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा केला जातो..
* हगणदारी मुक्त गाव :-घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघड्यावर शौच करणाऱ्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.
*भूमिगत गटार:- शासनाच्या भूमिगत गटार योजनेचा वापर करून गावातील सांडपाणी भूमिगत गटारी मार्फत विल्हेवाट लावली जाते.
*अंगणवाडी :- गावात ३ अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात.
* माध्यमिक शाळा :- माध्यमिक विद्यालय बेलगाव तऱ्हाळे या शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्था असून त्यांचेकडून गावातील व परिसरातील विद्यार्थी व मुली यांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते . तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्याकरिता सदर शैक्षणिक संस्थाकडून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असतात.
*सभागृह :- आमदार व खासदार यांच्या निधी गावकऱ्यांना कार्यक्रमासाठी सामाजिक सभागृह निर्मिती केली असून ग्रामस्थांना मोफत सुविधा दिल्या जातात.
*यात्रा महोत्सव:- दरवर्षी गावात अंबिका माता, खंडेराव महाराज ,यात्रा भरते तसेच गणेश उत्सव व नवरात्र उत्सव देखील जोरात साजरा होतो. सदर नवरात्र उत्सवात गावातील सार्वजनिक मित्र मंडळ यांच्या मार्फत जिवंत देखावे, चल चित्र देखावे सादर करून ९ दिवस भाविकांसाठी आयोजन केले जाते. तसेच मारुती मंदिर येथे अखंड हरीनाम सप्ताह आयोजित केला जातो. सदर सप्ताह दरम्यान तालुक्यातून हजारो भाविक येतात.
*डांगी जनावरांचे प्रदर्शन :- बेलगाव तऱ्हाळे पासून १५ किमी अंतरावर घोटी ग्रा.पं. मार्फत गेली ५० वर्षापेक्षा अधिक कालावधी पासून डांगी संकरित जनावरे व कृषी साहित्य, कृषी मालाचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येते, सदर प्रदर्शन मध्ये भाग घेण्यासाठी अहिल्यानगर, ठाणे, पालघर व अन्य जिल्ह्यातून ५ हजार पेक्षा अधिक डांगी व संकरित जनावरे आणतात व त्यांचा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचा व्यवहार प्रदर्शनामध्ये होत असतो. चांगल्या प्रतीच्या वळूची जिल्ह्यातील पशुवैदकीय अधिकाऱ्यां मार्फत रोख बक्षिस व चषक देऊन जनावरांची चांगल्या प्रकारची जोपासना करण्याकरीता प्रोत्साहीत करण्यात येते.
*अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजना :- अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटक योजनाचा माध्यमातून हाय मास्ट लाईट, कॉँक्रीट रस्ते, बंदिस्त गटारी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आपले नम्र
श्री.परसराम पावजी पवार श्री.रवींद्र विठ्ठल अहिरे
ग्रामपंचायत अधिकारी प्रशासक
ग्रामपंचायत बेलगाव तऱ्हाळे || ग्रामपंचायत बेलगाव तऱ्हाळे ||


★★★★★


जिल्हा परिषद शाळा बेलगाव तऱ्हाळे
जिल्हा परिषद शाळा बेलगाव तऱ्हाळ
गावात जिल्हा परिषद शाळेची स्थापना दिनांक १४ एप्रिल १८७३ रोजी झालेली असून तेथे इयत्ता १ली ते ७ वी पर्यंत वर्ग असून शाळेत मुलांची संख्या 79 व मुलांची संख्या 74 आहे. आजमितीस शाळा मंगलोरी कौलाची असून भविष्यात HAL सी.एस.आर. निधी अंतर्गत सदर इमारत आर.सी.सी. बांधकामाचे नियोजन ग्रामपंचायत करत आहे.
आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहेत. लहान वयातच मुलांच्या आकलनशक्ती वाढविण्यासाठी योग्य पद्धतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. खाजगी शाळांमध्ये चढाओढ सुरू झाली असून जिल्हा परिषद शाळांपुढे ते एक आवाहन तयार झाले आहे.
बेलगाव तऱ्हाळे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला असून खाजगी शाळेकडे वाढलेला कल लक्षात घेता जिल्हा परिषद शाळा ही ओसाड होत चालली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा देखील आधुनिक होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वारंवार व्यक्त होत असताना याची गरज ओळखून वस्तीपासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना सायकल सुविधा उपलब्ध करून देण्याचा ग्रामपंचायतीने प्रयत्न आहे


समृद्ध गाव, सुखद जीवन
ग्रामस्थ
"


जिल्हा परिषद शाळा बेलगाव तऱ्हाळे
बेलगाव तऱ्हाळे अंगणवाडी डिजिटल
बेलगाव तऱ्हाळे अंगणवाडी डिजिटल
ग्रामपंचायत बेलगाव तऱ्हाळे येथे दोन अंगणवाडी व तातळेवाडी येथे एक केंद्र कार्यरत असून तीन अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत आहे पाणी सुविधा उपलब्ध आहे तसेच तीन अंगणवाडी डिजिटल करण्यात आलेले आहेत. अंगणवाडीच्या मुलांना ग्रामपंचायतीमार्फत बेंच दिलेले आहेत. दोन्ही अंगणवाडी केंद्र पायाभूत सुविधांनी परिपूर्ण आहेत
